श्रीज्ञानदेवांनी विवेक वेलीची लावणी केली; साहित्य सोन्याच्या खाणी उघडल्या; ब्रह्मविद्येचा सुकाळ केला; नवरसांनी मराठी भाषेचा सागर भरविला..
महाराष्ट्र सारस्वताच्या पावन भूमीमध्ये श्रीज्ञानदेवांनी विवेक वेलीची लावणी केली; साहित्य सोन्याच्या खाणी उघडल्या; ब्रह्मविद्येचा सुकाळ केला; नवरसांनी मराठी भाषेचा सागर भरविला; उपमादृष्टांतादि अलंकार रत्नांच्या खाणी निर्मिल्या; गुढ अभिप्रायार्थांचे पर्वत उत्पन्न केले; नानाविध प्रमेयांची उद्याने निर्मिली. त्याच वेळी श्री नामदेव महाराजांनी कीर्तनरंगी नाचून ज्ञानाचे दीप चोहीकडे लागून आसेतुहिमाचल प्रांत उजळून काढला आणि साधकांना निरंतरची दिवाळी प्राप्त करून दिली. तसेच संतपरीक्षक श्रीगोरोबा काका, चोखट मार्गदर्शक श्रीचोखोबा, श्रीसंत सावताबाबा इत्यादी संतांच्या मांदियाळीने मराठी भाषेचा प्रांत उजळून काढून निरंतर ची दिवाळी केली. श्रीनाथांनीही आणि श्रीतुकोबारायांनीही आपल्या अनुभूतीसंपन्न साहित्याने विश्वाला परम कल्याणाचा मार्ग दाखविला.
गुरुवर्य श्री किसनमहाराज साखरे - श्री ज्ञानेश्वर महाराजांची वेदनिष्ठा
शब्द जैसे कल्लोळ अमृताचे हाच प्रत्यय येतो गुरुदेवांनी लिहिलेली साहित्य संपदा अभ्यासताना
Comments